web-ads-yml-728x90

Breaking News

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून  ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,  सर्व टीम्स अत्यावश्यक आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनीदेखील घरातच राहणे हिताचे असून  वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला थेट संबोधित केले.

No comments