web-ads-yml-728x90

Breaking News

पाच हजार कोटींच्या तीन करारांना दिली स्थगिती

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनच्या कपटी हल्ल्यामुळे 20 भारतीय जवान शहिद झाले होते. या घटनेनंतर संपुर्ण देशात मोठी संतापाची लाट उसळली आहे. देशभरात विविध ठिकाणी नागरिकांनी चीनी वस्तूंची होळी केली आहे. चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाका अशी मागणी नागरिक करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने चीनला मोठा धक्का दिला आहे. केंद्राशी चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने तीन चिनी कंपन्यांच्या प्रकल्पावर स्थगिती दिली आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे. आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनंतर यावर निर्णय घेण्यात येईल.मोठ्या प्रकल्पांना झटका>> ज्या प्रकल्पांवर बंदी घातली आहे त्यापैकी पुण्यालगतच्या तळेगाव येथे विद्युत वाहनांचा मोठा कारखाना आहे. असे म्हटले जाते की हा सुमारे 3500 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार असून यामध्ये 1500 लोकांना रोजगार मिळणार होता.>> हेंगली इंजीनियरिंग - या कंपनीने पुणे येथील तळेगाव येथे 250 कोटी गुंतवणूकीचा करारही केला होता, ज्यामुळे 150 लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती.

No comments