web-ads-yml-728x90

Breaking News

पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या  किनाऱ्यावर येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाचे पडसाद आता पुण्यातही उमटत आहे. पुणे शहरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे हवामान विभागाने पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती.
पुण्यात ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वहातील. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच, आज रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.


No comments