web-ads-yml-728x90

Breaking News

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई |
सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे असे भावनिक आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  काल नवी मुंबई येथे केले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सर्वश्री सुरेश मेंगडे शिवराज पाटील, अशोक दुधे, प्रवीण पाटील,पंकज डहाणे आदी अधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या  कोविड संदर्भातील होत असलेल्या कामाबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याबाबत आयुक्तांना सूचना केली. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी आधुनिक ड्रोन सुविधा आवश्यक सामग्री  घ्यावी अशाही सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या.बैठकीच्या  सुरुवातीला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने  लॉकडाऊन  काळात केलेल्या कामाबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री. संजीव कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य संदर्भातील घेतलेली काळजी तसेच त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा, परप्रांतीय कामगारांना केलेली मदत त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत केलेली कार्यवाही आदींची माहिती देण्यात आली.तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे बांधकाम,पोलीस स्टेशन बांधकाम संदर्भातील अडीअडचणींबाबत चर्चा केली.

No comments