web-ads-yml-728x90

Breaking News

शारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी,  क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे असून  मैदानी खेळामुळे आत्मविश्वास निर्माण होतो .या आत्मविश्वासाने मुले सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास,क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालय, ईएलएमएस स्पोर्टस रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून २० जूनपर्यंत वेबिनार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येक मुलाचे जीवन क्रियाशील होण्याकरिता तयार केलेला दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे क्रीडा व युवककल्याणमंत्री श्री. सुनिल केदार यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.सर्व मुलांमध्ये शारीरिक साक्षरता विकसित करण्यासाठी पालक,  शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असते. तसेच मुलांच्या विकासात गुंतलेल्यांना शारीरिक साक्षरतेचा अर्थ काय आहे आणि ते कसे विकसित केले जाऊ शकते हे समजून घेणे देखील गरजेचे आहे. प्रौढांप्रमाणे कौशल्य बजावण्याऐवजी ते शिकत असलेल्या कौशल्याच्या पुढील आवृत्तीकडे जाण्यावर पालकांनी भर दिला  पाहिजे. मुलांसमवेत काम करणा-यांना कौशल्ये शिकण्याच्या अवस्थांशी परिचित असणे देखील आवश्यक असल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

No comments