0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना  २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री श्री. शेख म्हणाले, डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही श्री. शेख यांनी यावेळी दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पंचनामे त्वरित करण्याचे  आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री.अस्लम शेख यांनी दिली.

Post a comment

 
Top