web-ads-yml-728x90

Breaking News

लॉकडाऊन काळात सायबरचे ४५८ गुन्हे दाखल


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लॉकडाऊन काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५८ गुन्हे दाखल झाले असून २५० व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मध्ये एकूण ४५८ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद ०५ जून २०२० पर्यंत झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९० गुन्हे दाखल झाले आहेत तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५० आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

No comments