web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याणमध्ये रामबाग परिसरातील रेशनिंग दुकानदाराला मनसेचा दणका !


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
कोरोना महामारीच्या काळात सरकारने टाळेबंदी जाहीर केली.या दरम्यान गोरगरीब नागरिक तसेच पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांना रेशन दुकानावर मोफत तांदूळ,गहू सरकारतर्फे देण्यात येत असताना  रामबाग येथील मुजोर रेशन दुखानदार कार्डधारकांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज प्रभाग क्रमांक ३८ मधील 'पटेल ट्रेडर्स' या  रेशनिंग दुकानावर मनसे ने धाड टाकलीया रेशन दुकानच्या मालकाविरोधात ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या.मुबलक गहू,तांदूळ असतानासुद्धा कार्ड धारकांना वेळेवर मिळत न्हवता तसेच ग्राहकांशी उद्धट व मानहानीकारक बोलत असे तसेच ग्राहकांच्या अंगावर धाऊन जात थुंकत असे याचा जाब विचारण्यासाठी दुकानचे मालक अवनी शहा यांना याबाबत जाब विचारण्यात आला. सोमवारपासून ग्राहकांच्या पुन्हा तक्रारी आल्यास संपूर्ण दुकान बंद करू असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला.ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकान मालकावर योग्य कारवाई करण्यासाठी शिधावाटप अधिकारी यांना मनसेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती कदम, उपशहर अध्यक्षा सौ.गिता काट्र्प, शाखा अध्यक्ष वैभव देसाई  व प्रची मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments