0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६७ हजार  ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Post a comment

 
Top