web-ads-yml-728x90

Breaking News

मिशनबीगिनगेन : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
#मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली जाईल. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्शा, ऑटो, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील. हा आदेश 1 जून पासून अंमलात येत असून तो 30 जून 2020 पर्यंत लागू राहिल.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्रीय मार्गदर्शिकेचे पालन या कालावधीत केले जाईल. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात रात्रौ 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहिल. स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत बंदीचे आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करतील. 65 वर्षावरील व्यक्ती, कोमॉ बिडिज असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि मुलांनी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments