web-ads-yml-728x90

Breaking News

नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला हजर असलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल | 
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच पनवेलजवळच्या नेरे गावात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामागचे कारण म्हणजे नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, प्रशासन खडबडून जागं झालं आहे.नेरे गावातील वामन पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या हळदीला चारशे ते पाचशे लोकांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करुन मुलाची थाटामाटात हळद केली होती. त्यानंतर 23 जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची चाचणी करण्यात येणार आहे. तर नेरे परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेव मुलाचे वडिल वामन पाटील, नवरा मुलगा व वधुच्या वडिलांवर पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments