0

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव - नवी मुंबई |
नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 5853 पर्यंत पोहोचला असून लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यापासून हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतोय. नवी मुंबईतील हॉटस्पॉट असणाऱ्या कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याने आता शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 तारखेपासून 7 दिवस पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a comment

 
Top