web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 40 हजार पास वाटप


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,40,696 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच 5,92,580 व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.राज्यात लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे 22 मार्च ते 31 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,21,075 गुन्हे नोंद झाले असून 23,641 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 11 लाख 93 हजार 848 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.


No comments