web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्री साहेब 3 महिण्यांचं लार्इट बिल माफ करा - सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांची मागणी


BY - विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
कोरोना व्हायरसच्या थैमानाने संपुर्ण देश हा या वायुच्या युध्दजन्य परिस्थितीचा सामना करत आहे.या युध्दात सर्वत्र शक्तीपणाला लावली असून या युध्दाचा सामना सर्वसामान्य जनतेपासून सरकारने केला आहे आणि आत्ताच्या घडीलाही हा सामना अटीतटीच्या भुमीकेतून करत आहेत अशातच कोरोना प्रादुर्भाव वर खाली होतांना आकडेवारीतून दिसून येत आहे.या कोरोनाच्या महामारीमुळे मृत्युमुखी आकडा तर आहेच परंतू अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे.अलीकडे हालाकीची परिस्थिती तयार झाली असून सर्वसामान्य जनता ही गेले तीन ते साडेतीन महिने घरीच असल्याने त्यांचे घर चालविण्यासाठीची परिस्थिती बिकट झाली आहे.अशातच जेवणाचे वांदे,कर्जाचे असणारे डोक्यावरील डोंगर,कामे बंद,मुलाबाळाच्या शिक्षणाचे टेंशन,मुलांचे लग्न, असे अनेक विचार प्रत्येकाच्या मनात भेडसावत असून कमविणारा एक आणि खाणारे अनेक तरीही मोठया संकटावर मात करून कुटूंबाचा उधरनिर्वाह गरिबीच्या हालाकीतील बांधव जगून दिवस घालवत आहेत अशातच विजेच्या बिलाचा वाढविला जाणार भार हा तर पेलवलाच जाणारा नसल्याच्या प्रतिक्रिया आदिवासी वाडयापडयातून ग्रामीण भागासह संपुर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांनी व्यक्त केल्याने आर्थिक सामना हा सहनशिलतेच्या बांधासारखाच राहिला आहे.घराबाहेर पडले तर कोरोना आणि नाही पडले तर घरातच टेंशनने मरोना अशी अवस्था आज येऊन ठेपली आहे यावर अनेकांचे प्रश्न असतील की घराचे लार्इट बिल 3 महिन्यांचे भरता येणार नाही तरीही बिलाचा आकडा हा वाढीव असून काही ठिकाणी तर हा आकडा जादा लावल्याने जमीनीसारखी कोरडवाहू स्थिती सर्वसामान्य जनतेची झाली आहे त्यामुळे बिलाच्या 3 महिण्यांची रक्कम माफ करून येणार्या जुलै महिण्यांपासून बिलाची रक्कम आकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी केली आहे.
कोरोनाच्या विळाख्यात सर्वच येत असून शासनाची योग्य दखल आणि उचललेले योग्य पाऊल त्यातच मुख्यमंत्री यांची योग्य आणि निर्भिड भुमिका ही कोरोनावर मात करणारी ठरली आहे.त्यांच्या या धाडसी कार्याला संपुर्ण आपला महाराष्ट्र सलाम करत आहे.मुख्यमंत्री साहेब आपण सर्वस्व ताकद पणाला लावली आणि महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहात याची खात्री आम्हास आहेच परंतू आर्थिक सामाना जो करणा आहे त्यामध्ये आपण लक्ष घातल्यास सरकार खर्या अर्थाने यशस्वी होणार यात शंका नाहीच.अनेकांची मागणी आहे कि हे माफ करा ते माफ करा परंतू सर्वांमध्ये लार्इट बिलाचा विषय गंभीर असल्याने आपण बिलाची रक्कम माफ करून सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे दाखवून द्दयावेत अशी विनंतीही सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी केली आहे.अनेकांची कुटूंबे ही चुलीवर असून कोरोनाच्या सावटाखाली घराबाहेर पडणारेही घरातच घाबरून गेले आहेत.कालपर्यंत मतांचे भिक मागणारे आज स्वतः घरात आहेत परंतू सर्वसामान्यांच्या यातना जाणून घ्यायचे त्यांचे भान हरविले गेले आहेत.काही अतिदुर्गम भागात अन्नधान्यापासून वंचितच आहेत.3 महिने घराबाहेर न पडल्याने त्यांची आर्थिक पाया खालावल्याने घरात राहून टि.व्ही आणि उपभोग वस्तुचा आधारच असल्याने कामधंदा जोड नाही त्यामुळे लार्इट बिल हा सर्वसामान्य कसे काय भरणार ? याचा विचार आता शासनानेच केला पाहिजे परंतू त्याकडेही लक्ष विकेंद्रीत झाल्याने एका महिलेने ही बाब ध्यान्यात घेऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची व्यथा शासन दरबारी मांडल्याने सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
--------------------------------------
मुख्यमंत्री साहेब आमच्या 10 ते 15 शेतकर्यांना 30 ते 40 हजार लार्इट बिल आले आहेत आपण जर पुन्हा सोसायटी कर्ज दिल्यास सदरचे लार्इट बिल भरता येर्इल.कारण अशातच कोणी कर्जही देणार नाहीत त्यामुळे आम्ही शेतकरी कोणाकडे आमची ओंजळ पसरवायचीआपण आमच्या भावना समजू शकता म्हणून आपणांस विनंती आहे की,आपण आमचे लार्इट बिल माफ करावे अन्यथा सोसायटी कर्ज द्दयावेत.कारण आमची क्षमता आता आर्थिक सामना करणारी राहिलेली नाही.आम्ही जर मोटार लावलीच नाही तर काय लावणार आणि काय उगवणार त्यातच कोरोनाचे प्रादुर्भावाने आम्ही खचत चाललो आहे.आपण आमच्या यातना जाणून घ्या आणि सहकार्य करा हीच अपेक्षा.- किसन भोर्इर,मुरबाड
--------------------------------------

No comments