web-ads-yml-728x90

Breaking News

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू.  राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना उद्योग स्थापन करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन)चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वेणूगोपाल रेड्डी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्याप्रमाणे चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने उद्गार काढले होते. एका व्यक्तीसाठी हे लहान पाऊल आहे, परंतु मानवजाती साठी मोठी झेप आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासाचे हे लहान पाऊल भविष्यात मोठी उलाढाल करणारी झेप ठरणार आहे. आज सुमारे सोळा हजार कोटी रुपयांचे तर नजीकच्या भविष्यकाळात आठ हजार कोटींचे सामजंस्य करार करण्यात येणार आहेत.

No comments