BY - युवा महाराष्ट्र
लाइव - औरंगाबाद |
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी
पसार झाले आहेत. हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्यांना शहरातील
किल्लेअर्क कोविड सेंटरला उपचारासाठी हलवण्यात आले होते. या 29 कैद्यांना प्रत्येक
रुममध्ये 2 कैदी असे 15 रूममध्ये उपचार दिले जात होते. त्यातील एका रूममधील दोन कैद्यांनी
बाथरूममधील काचा काढून पळ काढवा. ते दोघं हिमायातबाग मार्गे पसार झाल्याची माहिती आहे.
दोन्ही कैद्यांवर बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a comment