web-ads-yml-728x90

Breaking News

"मोदीजी एकाच्या बदल्यात 100 चीनी सैनिकांना ठार मारा


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पाटणा |
चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा” अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.बुधवारी संध्याकाळी शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं. यावेळी दु:ख, राग आणि अभिमानाची भावना दिसली.

No comments