0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
देश वारी शिक्षण भरारी घेण्याची प्रत्येक पालक विद्दयार्थ्यांची होती.माझा पाल्य परदेशात शिक्षणासाठी गेल्याचा अभिमान सांगणार्‍याच्या मनात आज कोरोनाची भिती कायम सतावत राहिल.आज कोरोनाचा संकट आला तसा पुन्हा कधी येणार तर नाही ना ? या विवंचनेने परदेशात जाणार्‍यांची संख्या घटणार यात शंका नाही.आज भारतातील लाखो परदेशात नोकरीला आहेत शिक्षणाला आहेत कोरोनाच्या कालावधीत त्यांची देशवापसी झाली आहे.त्यांच्या भावी समस्या गंभीर राहातील यात शंका नाही मात्र देशाप्रमाणे राज्या राज्यामधील मजूर सुध्दा आपआपल्या राज्यात स्थानिक होतील असा धाक कोरोनाचा प्रत्येकाला बसला आहे.प्रत्येकाचं स्वप्न मुंबर्इत होतं पुण्यात होतं नवीमुंबर्इसह अन्य शहरात राहाण्याचं होतं आयुष्याची पुंजी खर्च करून शहरात बंधिस्त झालेला मुलगा आर्इ बापा पासून वंचित राहिला गांवापासून वंचित राहिला त्यातुन शिकलेला धडा उदयाच्या काळात गांवातच घर हवे अंणातच हवा लॉकडाऊन अशा वातावरणात राहाण्याचा विचार होर्इल.आज ज्या गांवाच्या बोरी त्याच गांवाच्या वाभळी याचा प्रत्यय आला गांवानी गांवात ऐसी लावल्या सुट्टीची हवा खाण्याची मज्जा माज मोडला पैशाने सारं करता  येते मात्र कोरोनानी माणसातील माणुसकी जागी केली लांबचे संगे सोयरे मित्र आज स्थितीत एकामेकांच्या फायदयाचं नाहीत आणि संकटात मदतीचे ठरले नाहीत दुरून डोंगर साजरे अशी बोलवना झाली.माणसातील नेहमीची माणुसकी हारवण्यास कोरोनानी भाग पाडले मताला 200 देणारा सुध्दा दोन किलो तांदुळ घरापर्यंत घेवून येवू शकला नाही.निवडणुकीच्या काळात मतदारांची जबाबदारी घेणार्‍यांनी आज प्रत्येक आपआपल्या प्रभागात गोरगरीबाना अन्न धान्य औषधे जेवण देणे गरजेचे असताना हे काम पोलिस यंत्रणा काही समाजसेवक करत असल्याचे बोलले जात आहे.भिती पोटी कोणीही समोर येत नाही याचा अनुभव कोरोना आजाराने करून दाखवला मात्र कोरोनाच्या दहशतीने गरीबी अधिकच खालावली म्हणुनच कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचे पालण कर शपथ तुला कोरोनाची


Post a Comment

 
Top