web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडला वादळाचा तडाखा


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
आधीच दुष्काळ त्यात तेराव्या महिन्याप्रमाणे आलेल्या करोना संकटाशी कसाबसा सामना करीत असलेल्या मुरबाडमधील काही गावांमध्ये नुकत्याच आलेल्या वादळाने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना शेतीची कामे बाजूला ठेऊन घरांची डागडुजी करावी लागत आहे. बनाची वाडी, झाडघर, मोहवाडी, खडकपाडा आदी पाड्यांमधील अनेक घरांची वादळामुळे नासधूस झाली. वादळवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पाड्यांवरील जनजीवन विस्कळीत झाले. याचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना 'करोना'ची भीती बाजूला सारून घरांची डागडुजी करावी लागली. 'करोना'मुळे घराची डागडुजी करणारे मजूर मिळणेही सध्या कठीण आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांनी स्वत:हूनच घरावर कसेबसे छप्पर टाकून तात्पुरती डागडुजी केली. करोनाचे संकट असल्याने सर्वांनी घरातच सुरक्षित रहावे असे आवाहन शासन करीत आहे. मात्र ज्यांचे घरच सुरक्षित नाही, त्यांनी काय करायचे, असा येथील ग्रामस्थांचा सवाल आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या २२ गावांची कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

No comments