0

BY - मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
कोरोना व्हायरस आजाराच्या नावाने लोकाना बंधिस्त करून आपल्या मनमानी आदेशाने मानवधिकार पायमल्ली तुडवले कायदयाचा धाक दाखवून लोकांच्या नावे लाखोचा भ्रष्टाचार करणार्‍या मुरबाड मधील रेशनिंग धान्य पुरवठा अधिकारी त्यांचे वरिष्ठ अधिकार्‍यांची केंन्द्रीय पथकाव्दारे चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मांगणी नागरिकांनी केली आहे.कोरोना आजाराची बंधिस्त जनतेला केंन्द्र शासनाने तीन महिने धान्य पुरवठा करण्याचे आदेश  दिले. अंत्योदय प्राधान्य कुटूंबीयाना माणसी पाच किलो तांदुळ देण्याचे जाहिर केले त्याच बरोबर नेहमीप्रमाणे कार्डवरील 25 किलो देण्यात येणारे तांदुळ आणि केशरीकार्ड धारकाना माणसी 2 किलो तांदुळ 12 रूपये किलोने देण्याचे शासनाचे आदेश होते.ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीत,ज्यांचे नाव रेशनिंग कार्डात नाहीत त्यांना आधारकार्ड दाखवून तांदूळ गहू वाटप करण्याचा आदेश होता  त्याप्रमाणे शासनाकडून नियतन आले मात्र,मुरबाड तहसिलदार,पुरवठा अधिकारी यांनी ऑनलार्इन नावावर आलेले धान्य रेशनिंग कार्डधारकांना दिले  नाहीत.दुकानदारांकडे रेशनकार्डावर 6 लोक होते किंवा ज्यांच ऑनलार्इन आधारकार्ड नोंदणी नव्हते त्यांना तहसिलदार,पुरवठा अधिकार्‍याकडून धान्य दिलं गेलं नाही अशी माहिती दुकानदारांनी दिली.
          दुकानदारांना धान्य दिलं गेलं नसल्याने लोकांना धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या तसेच काही दुकाने बंद होती त्यांची जोडणी आपल्या मनमानीने करून धान्याचा काळाबाजार झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी तहसिलदार,पुरवठा अधिकार्‍याकडे केली असताना अद्दयाप त्यावर कारवार्इ झालेली नाही.
          मुरबाड तालुक्यातील मोरोशी,जांभुर्डी,धारगाव,मुरबाड,टाकेचीवाडी,सोनारपाडा मुरबाड,टोकावडे, धसर्इ सह अन्य परिसरात धान्यांचा काळाबाजार मोठया प्रमाणात झाला असून लोकांच्या तक्रारीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सुध्दा भ्रष्टाचाराला बळ देत आहे.        

      लोकांना बंधिस्त करून भ्रष्टाचाराविरोधात मोर्चे,आंदोलन,उपोषण लोक करू शकत नाहीत.अनेक मयत लाभार्थी गावसोडून गेलेले कार्डधारक माध्यमवर्गीय लोकांचा धान्य तहसिलदार,पुरवठ अधिकारी दुकानदारांनी मिळून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्याची चौकशी शासनाने स्वतंत्र पथक नेमून तक्रारदारांना पंच म्हणून घेऊन करावी अशी मागणी होत आहे.
          धान्य घेतांना पावत्या दिल्या जात नसून खोटया थंपचा र्इपॉस मशिनीवर वापर दुकानदार करत असून नक्की धान्य मिळाला की नाही हे गुलदस्त्यात राहिले आहे.तक्रारी ऑनलार्इन केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन ऑनलार्इन वरून चौकशी अधिकारी बचावाची प्रक्रिया आजमावतो परंतू वास्तविक घटनास्थळी न जाता व चौकशी न करता साटेलोटे करून तक्रारदाराची दिशाभूल करून धान्य काळयाबाजाराचा बादशाह म्हणून अनेक जण वावरू लागले आहेत.
          गेल्या 2013 पासून 2020 फेब्रुवारी पर्यंत यांच तहसिलदार,पुरवठा अधिकार्‍यांनी नियमित गहू,तांदूळचे कार्ड धारक त्यांची संख्या,लाभार्थी कमी हेाते त्यातही मयत आणि गांव सोडून बाहेरगावी गेलेल्यांची संख्या प्रचंड असताना धान्य नियतन सुरू होते त्यातून शेकडो क्विंटल तांदूळ,गहूचा काळाबाजार होत असे मात्र,या कार्डधारकांच्या नावाची नोंदी करून लाखो रूपयांचा धान्य काळाबाजार केला आहे.तीन महिण्याच्या धान्यापैकी  दोन महिण्याचे धान्य देण्यात आल्याचे समोर येत असून अधिकार्‍यांनी तक्रार करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना कार्डधारकाची तक्रार नाही असे सांगून शासनाला खोटे अहवाल सादर केले आहेत.
          टोकावडा येथिल एका रेशनिंग दुकानदारावर पहिल्याच दिवशी 17 गोणी तांदळाच्या अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रेशनिंग धान्य काही समाजसेवक,कंपनी धारकांना,दुकानदारांना देवून त्यांचेच वाटप गोरगरिबांना केल्याची चर्चा असून शासनाने ऑनलार्इन प्रक्रिया,कार्डसंख्या लाभार्थी,धान्य स्टॉक गोडावून दुकानदारांच यासर्व प्रकारची चौकशी करून किती लाभार्थीनी धान्य घेऊन गेले आहेत,किती लोकसंख्या किती बाहेर गावी गेले,गोडाऊनला धान्य किती आहे त्यांची चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनीही शासनाकडे केली आहे.याबाबत तहसिलदारांकडे तक्रारही केली आहे.

Post a Comment

 
Top