0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली त्या ठिकाणी पाहणी करुन तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केली. या प्रकाराचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होत. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. गंगाथरण, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदी उपस्थित होते.राज्यामध्ये 4 हजार 738 मदत शिबिर केंद्र असून या मदत शिबिरात 1 लाख 35 हजार बेघरांना आश्रय देण्यात आला आहे मदत शिबिरात त्यांना नाश्ता, जेवण व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कारोना बांधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 4 लाख 35 हजार व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Post a comment

 
Top