web-ads-yml-728x90

Breaking News

डिफेन्स मित्र मंडळ व आधार प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेले आरोग्य शिबीर संपन्न ...!BY - युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
मागील दोन महिन्यापासून कोरोनाचे आस्मानी संकट संपूर्ण जगावर घोंगावतेय.जगासह आपण सर्वच जण या संकटाचा विविध उपाय योजना राबवित सामना करित आहोत.याच पार्श्‍वभुमिवर आज दिनांक 31 मे 2020 रोजी उल्हासनगर 4 येथील आंबेडकर चौक सुभाष टेकडी परिसरातील डिफेन्स मित्र मंडळ व आधार प्रतिष्ठान तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व नागरिकांची आरोग्याची तपासणी करून त्यांना गोळया उपलब्ध करून देण्यात आल्या विशेष म्हणजे या आरोग्य शिबीरात नागरिक व डॉक्टर्स यांनी तोंडाला मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचा पालन केले. या आरोग्य शिबीर लागणारी जागा समाजसेवक डॉ.सुरेश गवार्इ यांनी आपल्या कंपाऊन्डमध्ये उपलब्ध करून दिली.त्याबद्दल मंडळांनी त्यांचे विशेष आभार मानले.या आरोग्य शिबीराला उल्हासनगर महापालिका डॉ.सुवेधिका सोनावणे, प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे,पोलिस अधिकारी शेट्टे उपस्थित होते डिफेन्स मित्र मंडळ व आधार प्रतिष्ठान यांनी त्यांचे सुध्दा आभार मानले आहे.यावेळी मंडळ  प्रतिष्ठानचे संदीप डोंगरे,सुर्यकांत सुर्वे,शाकिब खान,कैलास भंडारे,आमोल रेपे,प्रज्वल हासनाळे,शुभम कुंभार,कल्पेश जगताप,कुणाल बोडके,सागर दळवी, चंदन नेव्हरकर,योगेश वाघमारे व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments