0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
अरुण गवळीची कन्या योगिता गवळी (शुक्रवार 8 मे)  विवाहबद्ध होणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असेल. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. योगिताला आज संध्याकाळी हळद लागणार आहे.

Post a comment

 
Top