0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयातील शेतकर्‍यांची शेती पुरक कामे अपुर्ण असून अनेक रस्ते उखडून ठेवले आहेत.फणी टंचार्इवर मात करण्यास सर्वत्र टँकरने पाणी पुरवठा,शाळा,अंगणवाडी,दवाखाने,इमारती रस्ते दुरूस्ती,पुरहाणी भागातील नालेसफार्इ,ग्रामीण रूग्णालयातील रस्ते अशी अत्यावश्यक कामे शासनाने सुरू करावी त्यासाठी निधी उपलब्ध  करून द्दयावा,साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी पावसाळयात आरोग्य यंत्रणा सज्ज  ठेवावी,विंचू सापदंश यावरील औषधे,गॅस्टो,मलेरिया,टार्इफार्इड, सर्दी,खोकला विविध आजारावर औषध साठा उपलब्ध करून डॉक्टर कर्मचारी उपलब्ध करून द्दयावेत अशी मागणी मा.नगराध्यक्ष किसन कथोरे यांनी शासनाकडे केली आहे.
          ठाणे जिल्हयासह मुरबाड शहर तालुक्यात या समस्या जठील आहेत त्याकडे जिल्हापरिषद संबंधित विभागाचं दुर्लक्ष होतेय,नुकत्याच 45 दिवसाच्या लॉकडाऊन कालावधीत आम्ही तालुक्याचा नेहमीच द्वौरा करून रोजचा आढावा घेतला त्याची कल्पना स्थानिक आमदारांना दिल्याने अनेक समस्या मार्गी लागल्या. प्रशासकीय मनमानी कारभारात सुधारणा करून गरीबांना मदतीचा हात दिला.आरोग्याचा आढावा घेतला.त्या कालावधीत पावसाळी समस्या आमच्या समोर आल्या परंतू प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा,अंगणवाडया अनेक रस्ते,पाणी पुरवठा इंधनविहीरी,नळपाणी पुरवठा योजना या जिल्हापरिषध्देच्या अंतर्गत असल्याने त्याकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे त्याचप्रमाणे या समस्या स्थानिक आमदार मार्गी लावतील यासाठी त्यांच्याशी संपर्क केल्याची माहिती भाजपा मा.नगराध्यक्ष तथा मुरबाड नगरपंचायतीचे बांधकाम सभापती किसन कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना दिली आहे.

Post a comment

 
Top