0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
" मुखातून घेतो मी नाम श्रीहरीचे,तुज वाचून कोणी नाही देवा अवतार तुझेजगाला हेवा वाटेल असे काम करणारे अनेक जण पाहिल,गुणगान गाणारे अनेक समाजसेवक,समर्थक पाहिले,नावासाठी मनातून कामाची इच्छा नसल्याचे माणूसही पाहिले परंतू स्वतःच्याताटातील भाकर भुकेल्याला देणारे हे हात मुरबाडच्या मातीतून जन्मघेतलेल्या त्या माऊलीच्या लेकराचे समोर आले." आयुष्यात माणूस काही नाही कमवत,कमवितो ते फक्त नाव आणि नावासाठी कधी खोटेपणाही करतो परंतू जो श्रीस्वामी समर्थांच्या विचारांच्या प्रेरनेने घडतो तो केवळ गरिबांची सावली बनून राहतो अशीच सावली जी अनेक गोरगरिबांच्या सोबत पहिल्या भुमिकेतून आजच्या कोरोना लॉकडाऊनमध्येही सोबत राहून साथ देत मुरबाडकरांच्या मनात घर करून बसलेले,संस्काराचे मोती असणारे व आदर सन्मानाची त्यांची प्रथा,निस्वार्थी विचार  घेऊन सर्वसामान्यांमध्ये वावरणारे श्रीसमर्थ सुपर बाझार मॉलचे मालक,सर्व कर्मचारी वर्ग,सहकारी मित्र आज प्रत्येकांच्या सेवेसी तत्पर राहिले आहेत.
     मुरबाडमध्ये लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या नावाखाली अनेक व्यवसायिकांनी स्वतःची पोळी भाजत गरिबांच्या खिशाला मात्र चाप दिली व भ्रष्टाचाराचा मानकरी बनला.अशावेळी जी साथ हवी त्याजागी वाट लावली.व्यवसायक सर्वसंपन्न असला की,विकास आणि विचार नक्कीच केला जातो.अशाच विचार आणि विकासशैली जपणारे व आपल्या समाजसेवी कार्यातून उत्तुंग भरारी घेणारे श्रीसमर्थ सुपर बाजार मॉलने कशातही कमी नसल्याचे सिध्द केले आहे.वाजवी दर आणि सर्वसामान्यांना परवडनारे त्यांच्या मनात असणार्‍या सर्व इच्छा या श्रीसमर्थ सुपर बाझार मॉलने पुर्ण केल्या आहेत.वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन तर घरपोच सेवा यातून उंच शिखर गाठणारे श्रीसमर्थ सुपर बाझार आज मुरबाड तालुक्यात नामवंत ठरले आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग मीच माझे रक्षक आणि लढुया व जिंकुया कोरोना युध्दजन्य परिस्थितीला अशी मनोधारना स्वतः बरोबर तमाम जनतेच्या मनात रूजवणारे त्या मुरबाडच्या मातीतील गरिबीतून गरूड झेप घेणारे हिंदुराव कुटूंबीय व श्रीसमर्थ सुपर बाझाराचे  सर्व कर्मचारी,सहकारी यांनी माणूसकीची झरी जपत त्यांचे मनोबल वाढविले आहे.प्रशासनानी दिलेल्या आदेशाचे पुर्णतः पालन करत मुरबाडकरांसाठी सदैव तत्पर श्रीसमर्थ सुपर बाझार राहिले आहे.कोणाच्या खांदयावर कोणाचे ओझे जरी असले तरी येथे मात्र,मुरबाडकरांसाठी श्रीसमर्थ सुपर बाझार कोणतेही ओझे उचलण्यास तयार आहे हे या काळातही दिसू लागले आहे.खरेदी साठी येणार्‍या मुरबाडकरांना सॅनिटायझरची सुविधा व मास्कचे वाटप केले गेले,मुरबाड मध्ये नोकरीचा प्रश्‍न हा वार्‍यावरच राहिला असताना श्रीसमर्थ सुपर बाझारने मात्र मुरबाडमधील असणार्‍या तरूण तरूणींना प्रथम प्राधान्य देऊन जे काम पुढार्‍यांना करायचं होतं ते या मुरबाडच्या हिंदुराव कुटूंबियांनी केले.
श्रीसमर्थ सुपर बाझारमध्ये माणूसकी जपली गेल्याने मुरबाडकरांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे.नाही कोणता त्यांचा ग्रुप,देवाचं देणं आणि तुम्ही देवाचे रूप असे म्हणणं वावगं ठरणार नाही. श्रीसमर्थ सुपर बाझारने नाती जपली,पैसा कमविणे हा परप्रांतिय विचार करतो महाराष्ट्रीयन नाही त्यामुळे जनतेनेही परप्रांतीय वाल्यांना नापसंती दाखवत मुरबाडच्या भुमीतील तरूणाच्या त्या श्रीसमर्थ सुपर बाझाराला पसंती दाखविली आहे.कोरोनाच्या काळात इतरांनी दर वाढविले असून मुरबाडकरांनी त्या जाणल्या आहेत परंतू श्रीसमर्थ सुपर बाजार मॉलने अत्यावश्यक काळातही कोणत्याही प्रकारे दर न वाढविता अजूनही अत्यावश्यक वस्तुवर सुट दिल्या आहे.ग्राहकांना सर्व गोष्टी समजवून उपलब्धता करून दिले असून विविध संस्थांच्या मार्फत ना नफा,ना तोटा यावर अत्यावश्यक किट वाटप केले.मुरबाडच्या या अशा स्थानिक उद्दयोजकांनी स्थानिकांना रोजगार देत श्रीसमर्थ सुपर बाझारच्या कमिटी सदस्य,सर्व कर्मचारी यांनी एक नवा आदर्श जनतेसमोर घातल्याने पडत्या काळातही सावरण्याचे समाजकार्य या श्रीसमर्थ सुपर बाजारने केले असून सर्वत्र ठाणे जिल्हयात श्रीसमर्थ सुपर बाझार मॉलचे कौतूक होत आहे.
श्रीसमर्थ सुपर बाझारचे प्रदोष हिंदुराव यांची नेहमी आपल्या मुरबाडकरांसाठी धडपड असते.नागरिकांच्या शब्दाला मान देत त्यांच्या मनात असणार्‍या प्रश्‍नाचे निरासन केल्याने जनतेने श्रीसमर्थ सुपर बाझारचे प्रदोष हिंदुराव यांना मुरबाडच्या गरीब गरजूंची सावली व भुमीतील निष्ठावंत व्यवसायिक उद्दयोजक म्हणून ओळख दिली आहे.त्यांच्या कार्याला मुरबाडकरांनी सलाम करत पुढिल वाटचालिस मनपुर्वक शुभेच्छा  देऊन मुरबाडकर म्हणून आमची साथ सदैव आपल्याला राहिल अशा भावनाही मुरबाडच्या नगरिकांनी आमच्याशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत.

Post a comment

 
Top