0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे |
मुरबाड शहरात कोरोनाचा फायदा घेत व्यापार्‍यांनी ग्राहकांना भरमसाठ चढया भावाने वस्तुची विक्री सुरू केली आहे.त्यांच्यावर कारवार्इ करण्यास संबधित भ्रष्टाचारी अधिकारी अपयशी ठरल्याने नागरिक संप्तत झाले आहेत.मुरबाड मधील व्यापारी जीएसटीसह अत्यावश्यक वस्तुची किंमत ग्राहकांकडुन दुपट्ट घेतात त्यांना बिले दिली जात नाहीत ग्राहकांना हुडकावुन लावतात या संबधी आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी केल्या असताना कारवार्इ झालेली नाही.मुरबाड मधील  व्यापार्‍याकडुन कोरोना संकटात आडकलेल्या लोकांसाठी व्यापार्‍याकडुन कोणी सामन जमा करून त्यांना प्रचंड भाववाढीला प्रोत्सहान दिलं आहे काय? असा सवाल केला जातोय.व्यापारी संघाचे सदस्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अथ्यक्षांशी  संपर्क साधण्यास सांगितल्याने सामान्याना व्यापारी लुटतात की अन्य कोणी असा सवाल ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केला आहे.तहसिलदार नगरपंचायत पोलिस याकडे कारवार्इ करण्यास पुढाकार घेत नसल्याने नागरिकांनी थेट मुख्यमंत्री महसुलमंत्री गृहमंञ्याकडे ऑनलार्इन तक्रारी कराव्यात का असा सवाल नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे.मुरबाड शहारतील व्दारकादास रार्इसमिल मधील किराणा दुकान श्री समर्थ कृपा व खंडेलवाल किराणा दुकान तसेच अनेक व्यापारी ग्राहकांवर दादागिरी करून वाढीव भाव घेत आहेत अशी तक्रार थेट शासनाकडे नागरिकानी केली आहे.

Post a Comment

 
Top