0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कोरोनामुळे अनेकांचे हाल झाले असून काही जणांचा मृत्युही झाला असल्याचे आपल्या समोर आले आहे.लॉकडाऊनचा प्रभाव आणि कोरोनाची भिती सर्वांना झाली आहे.अशीच भिती आता मृत्यु झालेल्याला कोरोना झाला की नाही त्याची चाचणी येर्इ पर्यंत प्रेतही ताब्यात दिले जात नसल्याने प्रेतच्या प्रतिक्षेत कुटूंबियांना राहावयास लागत असल्याने अतुट नात्यामध्ये आणि जपणार्‍या संस्कार रूढीमध्ये कोरोनाचा हल्ला होतांना दिसत आहे.अशीच घटना ठाणे येथिल कळवाच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात घडली आहे.एक गर्भवतीमहिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर पुढिल उपचार करण्यासाठी रूग्णालयात आणले असता तिच्याबरोबर गर्भात असनार्‍या बाळाचा मृत्यु झाला आहे.सदर वृत्त अतिशय दुखःद असून डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने आणि रूग्णांच्या नातेवार्इकांना मार्गदर्शन न केल्याने येथून तिथं आणि तिथून इथं अशी प्रक्रिया चालत असल्यासे मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीनी सांगितले आहे.जेव्हा त्या महिलेला उपचारासाठी आणली गेले तेव्हा तिला उपचारासाठी उशिरा घेतले गेले त्यानंतर अर्ध्या तासाने सांगण्यात आले की तुमची पत्त्नी व गर्भातील बाळ मरण पावले.सदर व्यक्ती व महिला हे परप्रांतीय असल्याने तात्काळ दखल घेतली गेली नाही कि हलगर्जीपणा असा प्रश्‍न विचारला जात आहे.आर्इ बरोबर बाळाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून कोरोना होता कि नाही यासाठी तिचे प्रेत गेले दोन दिवस रूग्णालयातील शव गृहात ठेवण्यात आले असून अजूनही कोरोना रिपोर्ट चाचणी आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.त्या महिलेचे प्रेत मिळण्यासाठी तिचे पती वारंवार डॉक्टरांशी संवाद साधून रूग्णालयात फेरफटका मारत आहे.तरीही त्या निराशी पतीच्या हाती नाही रिपोर्ट मिळत आणि नाही प्रेत अशातच पतीने टाहो फोडला आहे.एकीकडे पत्नीच्या प्रेताचे अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत अन्न तोंडात जार्इना तर दुसरीकडे डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर कोणताही नेता,पुढारी पुढे कारवार्इसाठी व त्या पतीला दिलासा देण्यासाठी येर्इना.कोरोनाच्या नावाखाली चाललेला मनमानी कारभाराची चौकशी होऊन त्या डॉक्टरांना निलंबीत करावे अशी मागणी त्या दुदैव पतीने मुख्यमंत्री यांचेकडे युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून केली आहे.


Post a comment

 
Top