0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून इकबाल चहल हे काम पाहणार आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची सुद्धा मुंबईच्या अतिरक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कोरोना व्हायरसने कहर केला असतांना धडाडीचे निर्णय घेणारे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांचे नावं घेतले जात होते. 2019 ला परदेशी यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त सचिव सुद्धा होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी युडीडीचे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल यांची वर्णी लागली आहे. तसेच प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Post a comment

 
Top