0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.08 मे, 2020 रोजी राज्यात 80 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 42 आरोपींना अटक करण्यात आली असून  69 लाख 58 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासून दि.08 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 4 हजार 989 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2 हजार 182 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 474 वाहने जप्त करण्यात आली असून रु.13.55 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 3,851 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

Post a comment

 
Top