0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – लखनऊ |
उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत 15 ते 20 मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र, अचानक एका मालवाहू ट्रकने मजुरांच्या ट्रकला धडक दिली. ही दुर्घटना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बळी ठरलेले बहुतांश मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. हे सर्व मजूर राजस्थानवरुन बिहार-झारखंडला जात होते. या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मजुरांच्या परिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. आपण मृतमजुरांच्या परिवारासोबत आहोत, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जखमींवर योग्य उपचार केले जावेत, असे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Post a comment

 
Top