0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांना शपथ दिली. उद्धव ठाकरेंची विधिमंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणावर आलेले वादळ शांत झाले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे.


Post a comment

 
Top