0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोणासाठी कोन जगतो,कसासाठी कोण राबतो
जगण्याची उमेदच संपली,मरणासाठी पोशिंदा रोज जागतो
इंग्रजांच्या काळात युध्दाची भिती वाटत असताना जगाचा पोशिंदा कणखर भुमिका घेऊन जागत्या पाहर्‍यात जगण्याचा विचार करत होता.परिस्थिती तीच होती. रानभाज्या कांदळवणा खाऊन जगणारा माणूस उद्दया आम्हाला स्वातंत्र मिळाल्यावर आपलं घरटं बांधू…
          आज परिस्थिती तशीच झाली आहे.स्वातंत्र आहे पण आम्ही बंधिस्त  आहोत.जगण्याची उमेद आहे मात्र,जगण्यासाठी साधन नाही.सारं आमच्यासाठी आहे पण जगवणारा पोशिंदा उपाशी आहे.कौटूंबिक जबाबदारी पेलवतांना मरणाची भिती हृदयातून संपली आहे.
          हे सारं कोरोना आजारांनी घडवून आणलंआहे.संचारबंदी लॉकडाऊन माणसं जगवण्याची जबाबदारी असली तरी हातावर कमावून पानावर खाणार्‍यांनी डोकं टेकलं आहेत.खरच जगावं कशासाठी असा आत्मविश्‍वास शिल्लक राहिला नसल्याने जगण्याचा विश्‍वास हरला.
          आज महाराष्ट्रात मन दाटून गरीबी छुपवली जात आहे.त्यातून  जगण्याची उमीद हटली आहे.सरकार देणार देणार म्हणून आश्‍वादावर जगणार्‍यांना काय मिळाले याची चर्चा होतांना ज्यांना दोन तीन दिवस पांढरेकपडी धारकांनी खिचडी दिली त्यांचा तंबू गुल झाला.फोतोसेंसन संपल,नव्याचं नव दिवस,एक दोन पाच किलोने संपलं.आज 60 टक्के गरीबी जगलो तर जगलो अशा स्थितीत आहेत.ज्या  कोरोनाच्या भितीने  दाटलेला कंठ आजारीच्या पटांगणात उतरू लागला आहे.कोनी नाही कोणाचा कोण मरेल म्हणुन काळजी घेता आमची मग आमच्या कुटूंबाला द्दयाना जगण्यापुरतं साधन अशा आक्रोशाने बंधिस्त जनता  जगत आहे.कोरोना कोणी आपला कसा आला कधी जाणार यापेक्षा आम्ही कसे जगणार याचाच विचार करणारा जगाचा पोशिंदा आज सरकार काय देणार याकडे पाहत आहे.
आज मताच्या लाचारीसाठी घरात येणारा शहाणा सुरता आणि तार्इमा पुरता गावात येत नाही.एका मताला 200 ते 10 हजार देणारे आज दोन वेळेचे अन्न देऊ शकत नाहीत.ज्यांच्या कडून दिलं जातयं.त्यांना सुध्दा इतरांकडून जमावबंदी करून आपलं कपडे र्इस्त्रीचे घालून वाटप करत आहेत.पुन्हा हेच दानशूर आमदार,खासदार,नगरसेवकअन्य पदांसाठी मते मागायला येतील अशी चिड खवळलेल्या गरीबीत निर्माण झाली आहे.
          देणार्‍यांचं हात गरीबीकडे वळले नाहीत,ज्यांना गरज मदतीची आहे त्यांना टाटा सुध्दा कळले नाही.छोटे उद्दयोग धम्दे बंद झाल्याने त्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे.शेतकरी संकटात आला आहे.शेतकरी  संकटात आला आहे.वृत्तपत्र क्षेत्रातील सामान्य संपादकीय मंडळ,माल,कंपन्या, प्रचंड संकटात सापडले आहेत यांच्याकडून दोष कोरोनाला दिला जातो मात्र,केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना वार्षिक मदत म्हणून अनुदान दिलं  पाहिजे किंवा दानशूर देवस्थाने यांना मदत करण्याचे आवाहन केले पाहिजे.
          आज मंदीरे बंद जाली आहेत.खरंतर मंदिरात सामान्य गोर गरिबांचा एक रूपया पासून दहा दिले जातात.संकटसमयी हेच पैसे गरीबांना थेट नाहीत तर सरकारला जातात असुद्दया मात्र,आता मंदिरे उघडुच नका ना ? एक वर्षे जाऊ द्दया ना ?
          कोरोनाने मला मरण आलं तरी चालेल परंतू माझ्या डोळयासमोर  माजी मुले भुकेली राहिली नाही पाहिजेत असं प्रत्येक मौल मजुराला वाटत आहे.एरवी हमाली करून मुलबाळाची पोट भरणारा आज कोणत्याही मदतीविना कुटूंबासह उपाशी आहे.उद्दया पुन्हा माझा संसार घर कसं सावरणार जगन्याच्या भिती तुटलेल्या आहेत.प्रत्येक गरीबीनी पिचलेला माणुस कोरोनाच्या लढार्इत हारला आहे असे प्रत्येकाचं मत व्यक्त होत आहे.
          देश वाचवताना गरीबी जास्त  वाचली आहे.गरीबाचं स्वप्न  उडाण  मातीमोल झालं आहे.शिक्षण,नोकरी,अधिकारावर आज कोणीही बोलू शकणार नाही.कारण त्यांच कुटूंब जगवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक रमला आहे.देशाचा लॉकडाऊन राज्याचा लॉकडाऊन कधी उठणार म्हणून प्रत्येक जण तारीख पे तारीख वाट पाहत आहे.कोरोनानी ज्यांना दिलं.दान त्यांना भरपूर दिलं मात्र,काहींना लाल कार्डवरच्क्षा 2 किलो तांदूळ 12 रूपयात विकला जातो.तो सुध्दा विकत  मिळाला नाही.गरीबी हटाओ योजनेत भ्रष्टाचार होत होता.मात्र,लोकांना काम मिळायाचा येथे कोरोनाच्या नावाखाली एवढा भ्रष्टाचार  सुरू आहे की धन पण नाही आणि काम सुध्दा हिशोब पण नाही आणि कारवार्इ  सुध्दा नाही फक्त बंधिस्त जगा तुम्ही तुमच्या भरवशावर असाातच गरीबीनी डोकं टेकलं आणि जगण्याचा विश्‍वास संपला विश्‍वास हरला.


Post a comment

 
Top