0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता मिळवली असून, लाभार्थी असलेल्या जवळपास 1 लाख 97 हजार 16 विद्यार्थ्यांना 6 दिवसाच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपापल्या खात्यावर मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या शिष्यवृत्ती संदर्भात मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता देत, वित्त विभागामार्फत शिष्यवृत्तीचा 462.69 कोटी रुपये निधी समाज कल्याण आयुक्तालयास वर्ग केला आहे.राज्यातील अनुसूचित जातीच्या 1 लाख 69 हजार 171 विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच 27 हजार 845 विद्यार्थ्यांची फ्रीशिप शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग याद्वारे मोकळा झाला आहे.मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1 लाख 69 हजार 171 विद्यार्थ्यांची एकूण 347 कोटी 69 लाख रुपये शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या 27 हजार 845 विद्यार्थ्यांची 114 कोटी रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वित्त विभागाने तातडीने आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र, यांच्या खात्यावर वर्ग केली असून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना येत्या 6 दिवसांच्या आत प्रत्यक्ष वाटप केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

Post a comment

 
Top