0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - चंद्रपूर |
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी वेबफोरोस कंपनीने तयार केलेले डीलाईव्हआर ॲप जिल्हा प्रशासन लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.जिल्हा प्रशासनाने वेबफोरोस कंपनीशी यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी काही दिवसातच हा ॲप जीवनावश्यक पुरवठा  करण्यासाठी सेवा देणार आहे. De-Live-R हा ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता. यासाठी  <https://play.google.com/store/apps/details?id=webphoros.com.deliver> या लिंकचा वापर करुन ॲप डाऊनलोड करावे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असताना. हा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना  तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. लॉकडाऊच्या काळामध्ये  जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहे. परंतु बाहेर कोरोनाचा संसर्ग कधी पण होऊ शकतो, हा संसर्ग होऊ नये व नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच व्हावा, त्यावर नियंत्रण असावे, कोणाची फसवणूक होऊ नये,तसेच नागरिकांचा यामध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी डीलाईव्हआर ॲपची मदत होणार आहे. या ॲपवर ग्राहक आणि संबंधित दुकानदार या दोघांनीही आपली नोंदणी करणे आवश्यक आहे किराणा किंवा तत्सम खरेदीसाठी ज्या पद्धतीने चिट्ठी बनवली जाते त्याच पद्धतीने सोप्या भाषेत हा ॲप सामान्य नागरिकाला देखील वापरता येणार आहे यासाठी स्थानिक भाषेतील अनेक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकाला त्याचा मालक घरी प्राप्त झाल्यानंतरच खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे द्यायचे आहे.हा ॲप कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आल्यामुळे ग्राहक दुकानदार आणि घरपोच वस्तू पोहोचवून देणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येकाच्या संपर्काची सूची देखील प्रशासनाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झाल्यास लगेच उपाययोजना करणे प्रशासनाला सोपे होणार आहे.किराणा, भाजीपाला, मेडिकल, डेअरी बेकरी, अंडी, चिकन, मटन, वॉटर कॅन आधी काही प्राथमिक विभागणी या ॲप मध्ये करण्यात आली आहे.कंपनीचे संचालकांनी यावेळी सामाजिक दायित्व च्या भूमिकेतून हा ॲप आम्ही तयार केला असून या संबंधीत काही अडचण असल्यास 9730854135,770949066,9637404761 या क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्रपूरच्या नागरिकांनी या ॲपचा वापर करावा व घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Post a comment

 
Top