0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या सहाव्या उमेदवारामुळे वाद निर्माण झाला होता. आता या वादाला पुर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अर्ज दाखल करणार आहेत.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी आज महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रविवारीच महाविकास आघाडीचा तिढा सुटला आहे. ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Post a comment

 
Top