0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील अन्न पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांना अन्न पदार्थ, औषधे व जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे दिली. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात अन्न पदार्थ तसेच औषध उत्पादक, वितरक व पुरवठादार यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.कामगार स्थलांतरित झाल्याने निर्माण झालेली समस्या, त्याच प्रमाणे कच्चा माल आणि दळण वळणाचा साधनांच्या अभावामुळे उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे डॉ.शिंगणे यांनी आश्वासन दिले.

Post a comment

 
Top