0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक अनधिकृत इमारती प्रत्येक प्रभागामध्ये उभ्या राहिल्या असून रस्ते,गटारी,मोरव्या,शौचालय यांची कामे इस्टिमेंट प्रमाणे न करता बोगस बिले काढली आहेत.सार्वजनिक बांधकाम,नगरपंचायत संबंधित अधिकारी,कर्मचार्‍यांना टक्केवारी देऊन केलेल्या कामांचा मोजमाप इस्टीमेंट  प्रमाणे तपासून ठेकेदारावर कारवार्इ करावी.
          ठेकेदारीने काम करणारे काही तक्रारदारांना धमकावत असतात.अधिकारी त्यांचेच चोचले पुरवतात ही गुंडीगरी भाजपाच्या कालखंडात सुरू झाली असून वरिष्ठांनी त्यामध्ये लक्ष घालावे,पदाधिकारी गुंडगिरी करत असल्यास त्याला चाप द्दयावा अन्यथा माणूस हा माणूस असतो ज्या गावाची बोरी त्याच गावच्या बाबली असतात या गोष्टी विकास समर्थ पणे पैलणार का ? असा सवाल केला जात आहे.
          मुरबाड मधील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून संतोषीमाता मंदीर,मातानगर,सोनारपाडा,देविची आळी,बाजार पेठ,नागाचा खडक यांसह सर्वत्र केलेले रस्ते या ठिकाणी उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारती यांची चौकशी संबंधित अधिकार्‍यांनी अद्दयापही  गुलदस्त्यात ठेवली आहे.महसूल विभागाने नगरपंचायतीच्या अतिक्रमणावर कारवार्इचे आदेश दिले असून सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी वापरून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी शासनानी करण्याचे आदेश संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले होते त्याकडे शासनाने लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे.


Post a comment

 
Top