0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शहापूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाची संख्या ही 32 वर गेलीये. यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय डॉक्टरचा समावेश आहे. तर खाजगी रूग्णालयातील एक कर्मचा-याला देखिल कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये बहुसंख्य रुग्ण मुंबईमहानगर पालिकेचे कर्मचारी आहेत. आता यांच्या संपर्कात किती जण आले आहे याची चौकशी सुरु करण्यात आले असून याचा शोध सुरू आहे.

Post a comment

 
Top