0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 मे 2020) दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. फडणवीस काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत. ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असल्याची टीका विरोधक वारंवार करत आहेत. भाजपने राज्य सरकारविरोधात दोनच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन छेडले होते. काल भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.Post a comment

 
Top