0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
रस्त्यात माणसात भांडणे लावली आहेत.कोरोनाच्या भितीने गावाच्या,प्रभागाच्या सिमा बंद केल्या जात आहेत.त्यातून हाणामार्‍या माणसांच्या मनात द्वेष,राग,संशय निर्माण करून कोरोना खुनापर्यंत पोहोचला आहे त्याचं ताजं उदाहरण पालघर मधील साधूंचे हत्याकांड म्हणावं लागेल.
          गावातला माणूस गावात येऊ दिलं नाही.आर्इच्या प्रेमावर मुलांना आपलं आपण जगावं शिकवलं.कोरोनाच्या नावाने त्यांचा कर्ता धनी कोण याचा शोध आणि बोथ होत नाही.
          शासनाचे आदेश पाळतांना नागरिकांना पल्तांना प्रत्येकांनी पाहिले.त्यांचाच फायदा कायद्दयावर बोट ठेऊन अनेक अधिकार्‍यांनी घेतला मात्र,मुरबाड शहरात नगरपंचायत मुख्याधिकारी,मुरबाड तहसिलदार,पोलिस ठाणे,आरोग्य अधिकारी यांचे मनमानी आदेश लोकशाहीला घातक ठरलेलं बिल कोरोनावर कोरला जात आहे.
          मुरबाड शहरात तालुक्यात गावोगावी रस्ते बंद आहेत.मुरबाड शहरात गल्लीबोळे प्रभागात रस्ते बंद करून कोरोनाचा एकही रूग्ण नाही.जिल्हाधिकार्‍यांच आदेश नसताना तीन दिवस मुरबाड बंद ठेवून लोकांना दुध,भाजीपाला,किराणा पासून रोखणार्‍या त्या जबाबदार अधिकार्‍यावर कारवार्इ झाली पाहिजे अशी संतप्त बावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
          तीन दिवस घरात कोंबल्यावर चौथ्या दिवसी भाजीपाला दुध किराणासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी गावातील रस्ते नगरपंचायत,पोलिसांनी बंद केले.वाहने शहराबाहेर जाऊ  शकत नाहीत.रूग्णालयात रूग्ण जाऊ शकत नाही अशा बेबंदशाही हुकूमशाही अधिकार्‍यांना कोण पाठिशी घालतंय ? कोण मॅसेज फॉरवर्ड करतंय ? अशांवर कारवार्इ करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहेत.Post a comment

 
Top