0

BY - मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
गेली 6 वर्षे एकही अंकाचा खंड न पडता नियमीत संपुर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्वपनज्योती टार्इम्स वृत्तपत्राच्या 6 व्या वर्धापण दिनी निमित्त,उत्कृष्ठ,गुणवंत काम करणार्‍या प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी, पत्रकार,राजकीय,लोकप्रतिनिधी,कलावंत,गायक,शिक्षक,विद्दयार्थी,समाजसेवक,डॉक्टर,व्यवसायिक,कामगार अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
          स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र तसेच विकासमंच संस्था यांच्या संयुक्त विद्दयमाने हा पुरस्कार सोहळा मुरबाड येथे येत्या काही दिवसांत लॉकडाऊन संपताच साजरा होणार आहे.या पुरस्कारासाठी गुणवंतानी आपल्या कार्याची माहिती,पासपोर्ट सार्इज फोटो खालील व्हॉटसअप नंबर तसेच  या इमेल वर 30 मे पर्यंत पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
          गेली 5 वर्षे 51 पुरस्कार,550 लोकांचा सन्मान केला जात असून गोर गरिबांना शालेय विद्दयार्थ्यांना मदत केली जाते.वृत्तपत्राचे संपादकीय मंडळ विकासमंच अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांच्या पुढाकाराने गुजरात,गोवा,महाराष्ट्र,केरळ,उत्तरप्रदेश,दिल्ली अन्य राज्यात विकासमंच सामाजिक कार्य करत आहे.या पुरस्कार सोहळयात युवा महाराष्ट्र लार्इव्ह चॅनेलवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून या उपक्रम कार्यक्रमाला जाहिरातदार,देणगीदार,दानशूरांनी आर्थिक मदतीचा हात द्दयावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top