web-ads-yml-728x90

Breaking News

राया येथिल रेशनिंगवाल्याची ग्राहकांवरील आरेरावी भाषा ; रेशनिंग घेतल्याची पावती मागितली असता शासनानी पावती देण्यास नाही सांगितले असे दिले दुकानदारानी उत्तर


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – खडवली |
सध्या रेशनिंग धान्याचा विषय संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असताना ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यासह कल्याण तालुक्यातील राया येथिल परिसरातील गुरूनाथ मोहिते यांनी केशरी कार्डावरील धान्य घेण्यासाठी गेले असता सदरहू फर्डे नामक दुकानदाराने समजवून न सांगता आरेरावी भाषा वापरून घेतलेल्या  धान्याची पावती  देण्यास नकार दिला.ग्राहक गुरूनाथ मोहिते यांची परिस्थिती गरिबीची असून लॉकडाऊनमध्ये कुटूंबाचे पालनपोषण करणेही अवघड झाले आहे.त्यातच दुकानदारानी ग्राहकांना समजवण्याएैवजी अरेरावी भाषा वापरली आहे.गुरूनाथ मोहिते यांनी धान्य घेतल्याची पावती त्या दुकानदाराकडे मागितली असता शासनाने आम्हाला पावती देण्यास सांगितले नसल्याचे दुकानदारानी मोहिते यांना सांगितल्याने सदर विषय हा अन्न व नागरी पुरवठा विभाग ठाणे यांचेकडे ऑनलार्इनद्वारे पावती न देण्याच्या संदर्भात अनुमती दिली का अशी विचारणा केली आहे.लाखो करोडोचा घोटाळा आणि होणारा काळाबाजार हा धान्य विभागात झाला आहे.केशरी कार्डावर दोन महिण्यांचे रेशनिंग आले  असताना एक महिण्याचा धान्य दिला असल्याचे गुरूनाथ मोहिते यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.वरिष्ठ अधिकारी दोन महिण्यांचे नियतन संबंधितांना दिले असल्याचे सांगतात परंतू परमिटच्या घोटाळात एक महिण्याचे धान्य दिले गेले असून जून महिण्याचे धान्य  वाटपासाठी जून महिण्याची वाट तहसिलदार अन्न पुरवठा विभाग अधिकारी पाहत असल्याचे समजत आहे.सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग दाद देत नाही.दुकानदार आरेरावी भाषा वापरतात त्यामुळे सर्वसामान्यांच्या तक्रारीला  मुख्यमंत्री महोदयांनी  न्याय मिळवून  द्दयावा  अशी मागणी गुरूनाथ मोहते यांनी या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या मध्यमातून केली आहे.कल्याण तालुक्यातील राया रेशनिंग दुकानदारावर अन्न पुरवठा विभाग अधिकारी कृपादृष्टी का करूना आहे,सर्व सामान्यांच्या  तक्रारीला केराची टोपली का दाखवत आहे असा सवाल गुरूनाथ मोहिते यांनी केला आहे.ऑनलार्इन नाही म्हणून ऑफलार्इन द्वारे धान्य दिले जाते परंतू पावती न दिल्याने शासनाच्या नावाखाली काळाबाजार केला जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी याकडे लक्ष घालून आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्दयावा तसेच केशरी कार्डावरील धान्य घेतलेल्या सर्व ग्राहकांना पावती देण्याचे आदेश द्दयावेत अशी मागणी  भुमिहीन असलेल्या व महाराष्ट्र राज्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून मागणी करत आहे असे गुरूनाथ मोहिते यांनी प्रसिध्दीमाध्यमातून विनंती केली  आहे.


No comments