0

BY - केदार नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
कल्याणमधील योगीधाम येथे राहणारा उल्हासनगर 04 येथिल पाच दुकान या परिसरात हरिओम बेकरीच्या बाजुला एका मेडिकलवाल्याला कोरोनाची लागण झालेली माहिती समोर येत असून सदर व्यक्ती एक नामांकित हॉस्पीटल येथे आजारी असल्याचे कळताच अ‍ॅडिमट झाला होता.परंतू त्याला कोरोना झाला असे सांगण्यात आले तेव्हा त्यास तात्काळ हॉस्पीटलने बाहेर काढले व कोणत्याही प्रकारे कोरोना झाले असल्याचे सर्टिफिकेट दिले नसल्याचे कळून आले आहे.
तेव्हा तो पॉझिटिव्ह रूग्ण मला कोरोना झाले आहे मला अ‍ॅडमिट करून घ्या व मला मार्गदर्शन तरी करा तरी त्या मेडिकलवाल्याला तात्कळत ठेवले तेव्हा कल्याण डोंबिवली खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांस त्या व्यक्तीने फोन लावल्याने त्या मेडिकलवाल्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन पुढिल उपाययोजना करून पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Post a comment

 
Top