web-ads-yml-728x90

Breaking News

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापूरातूनही कोल्हापुरकर सावरल ! पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग केली आहे. गेल्या वर्षीच्या महापुराचा कटू अनुभव डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये यावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला असून पूर बाधित गावात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे मान्सूनपूर्व आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोटींची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफची 2 पथके बोटींसह मागणी केली असून भारतीय तटरक्षक दलही बचाव व मदत कार्यासाठी सक्रिय झाले आहे.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली असून, यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट- ओबीएम सह – 8, रबर बोट(जुन्या-नव्या)- 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉयरिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झुम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईत-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचा रेस्क्यू फोर्स तैनात केला आहे. गावागावात तरुणांनी फौजच उभी करण्यात येणार आहे.गेल्या वर्षी पाऊस आणि अतिवष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 386 गावे बाधित झाली, यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25,गडहिंग्लज -27, चंदगड-30,आजरा-30 आणि भुदरगड तालुक्यातील -23 गावांचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके गठीत केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. पूरबाधित गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे.


No comments