0

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |
सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल ने अलीकडे सर्व विद्दयार्थ्यांना ऑनलार्इन प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली होती या प्रशिक्षणामध्ये सर्व विद्दयार्थ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.वकीली प्रशिक्षण पाहिले तर जितकं समजतो तेवढं सोपं नाही.परंतु लॉकडाऊनमुळे सर्व महाराष्ट्रातील शिक्षण संस्था,महाविद्दयाल बंद असून सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी आपली एकता दाखविली आहे.शासन कटिबध्द असून कोरोनाशी लढा देतांना दिसत आहे.या कोरोनाजन्य युध्दात आपल्याला जिंकायचं असून त्या युध्दाला सामोरे संपुर्ण भारत देश गेला आहे.काही शाळा,महाविद्दयालयांच्या परिक्षा रद्दही करण्यात आल्या आहे.परंतु वकीली शिक्षणाचे हे वर्ष सरले तर प्रशिक्षकांना कायदयाची माहिती कसे मिळणार या दृष्टिकोनातून सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल ने ऑनलार्इनद्वारे वेबिनार घेत जोमाने ऑनलार्इनद्वारे 80 ते 100 वकीली शिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षकांना कायदा सुव्यव्यवस्था आणि भारतीय संविधान यांची परिपुर्ण माहिती विद्दयार्थी प्रशिक्षकांना देत असल्याने सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल ने प्रशिक्षणाने जोरदार विक्रम गाठला आहे.
या प्रशिक्षणाला विद्दयार्थ्यांनीही आपली दैनंदिन ऑनलार्इन प्रशिक्षणाला हजेरी लावली आहे. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेलचे प्राचार्य मृत्युंजय पांण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विद्दयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत वकीली शिक्षणाची माहिती विद्दयार्थ्यांना पटवून दिली आहे.परिक्षा रद्द हो किंवा न हो शिक्षण काही फुकट जात नाही त्या दृष्टीने मनोधारणा बाळगून विद्दयार्थ्यांना अडचणी भेडसावत असल्यास त्याची माहिती पटवून दिली जात आहे. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल ने या ऑनलार्इन प्रशिक्षणातून वेबिनार घेऊन जनजागृतीही केली आहे.सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य मृत्युंजय पांण्डेय सर,व्हॉ.प्राचार्यसोनकर सर,प्रो.ललित पगारे सर,प्रो.अभिनव दुबे सर,प्रो.रंजिता अग्रवाल मॅडम यांनी विद्दयार्थ्यांना मार्गदर्शन करत सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल कोणत्याही बाबतीत मागे नाही हे पुन्हा सिध्द केले आहे.विद्दयार्थ्यांनीही ऑनलार्इन वेबिनार,प्रशिक्षण घरी बसल्या मिळत असल्याने सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ पनवेल च्या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत.

Post a comment

 
Top