0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड येथिल गणेशनगर येथिल श्री सुपर बाजार मॉल नामक ग्राहकांना पक्के बिल देत नसल्याचा महाप्रताप कारनामा होत असल्याने ग्राहकांकडून नाराजीचा सुर उमटत आहे.रोख रक्कम देऊन ग्राहक सामान खरेदी करत असून बिलाची मागणी केल्यास बिल देत नसल्याने शासनाचा कर बुडवत ग्राहकांची लयलूट केली जात आहे.संबंधित दुकानदाराचे नाव चौधरी असल्याचे समजत असून चढया भावाने वस्तुची विक्री  केली जात असून संबंधित दुकानाची व जी.एस.टी कराची चौकशी करून दुकानाला सील करून कायदेशीर कारवार्इ करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे.नागरिकांना लूटून बिलाची पावती देत असून कच्च्या बिलावर जादा भावाची रक्कम लावली जात आहे.लॉकडाऊन काळात नागरिकांची लूट केली गेली आहे याकडे शासनाने लक्ष केंद्रीत करून चौधरी नामक व्यक्तीनी सुरू केलेली लूटमारी थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.Post a comment

 
Top