0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि ढासळत चाललेल्या आरोग्य व्यवस्थेवर नजर टाकत ‘मुंबईतील ढासळती रुग्णवाहिका सेवाकोरोना पेंशटच्या जीवावर या विषयांतर्गत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या ऑनलाईन सुनावणी होणार असून मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात येणार आहे. सॉलिसीटर ध्रुव लीलाधर हे सोमैया यांची बाजू मांडणार आहेत.
 या याचिकेत खालील बाबींवर नमूद करण्यात आल्या आहेत.
          ·        सरकारी 108 रुग्णवाहिका सेवेत सध्या 93 रुग्णवाहिका कार्यरत
·        मात्र सरकारी आणि खाजगी मिळून फक्त 100 रुग्णावाहिका सुरु आहेत.
·        खाजगी रुग्णवाहिकांकडे मनुष्यबळाची कमतरता
·        20 मार्चपर्यंत मुंबई RTO कडे 2920 खाजगी एमब्युलन्सेस रजिस्टर
·        नोंदणीकृत खाजगी रुग्णवाहिका सुरु कऱण्यासाठी कार्यवाही कधी करणार?
·        मुंबईत आजच्या घडीला फक्त 10% रुग्णवाहिका सुरु आहेत.
·        फक्त रुग्णवाहिकेसाठी पेशंटला तासनतास वाट पाहावी लागत आहे.
·        रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने पेशटंचे होणारे मृत्यू


Post a comment

 
Top