0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयाखाली अवैधरित्या भारत वार्इनशॉप गोडावून असुन गेले कित्येक वर्षे बेकायदा इमारतीमध्ये दारूचा धंदा सुरू आहे.भारत वार्इनशॉप लगत जिल्हापरिषद रेस्टहाऊस शासकीय कार्यालय शाळा अन्य वस्तुसह हा रस्ता सार्वजनिक ठिकाणाचा आहे.भारत वार्इनशॉप मधुन दारू खरेदी करून दारू पिणारे परिसरात प्रचंड धुमाकुळ घालतात,रस्त्यावर बाटल्या फोडतात,चोर्‍या मोर्‍या हाणामार्‍या होतात अशा अनेक घटना घडल्या असुन स्थानिक पोलिसानी त्या प्रत्येक घटनेची दखल घेवुन कारवार्इ केली आहे.भारत वार्इनशॉप मधुन बनावट दारू विक्री होते अशी चर्चा होती त्यावेळी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यानी भारत वार्इनशॉपवर धाड टाकुन चौकशी केली होती.परंन्तु त्यांनी किती बनावट दारू जप्त केली पुढील कारवार्इ काय केली याची माहिती स्थानिक पत्रकारानाही मिळू शकली नव्हती.शासनाच्या जीआर अटीशर्तीची पायमली करून उत्पादन शुल्क खात्याला तपासणीत काय आढळतय सत्य का बाहेर येत नाही हा संशयाचा विषय असुन शासनाने मुख्यमंञ्यानी भारत वार्इन शॉप कायमचा बंद करून लॉकडाऊन कालावधीत वार्इनशॉप उघडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होर्इल रस्त्यावरील महिला नागरिकाना त्रास होर्इल या भारत वार्इनशॉपची चौकशी स्वतंत्र पथक नेमून करावी त्यांच्या टिटमार्क असलेल्या दारूच्या स्टॉकचा ऑडीट करावा अशी मांगणी केंन्द्रीय पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नामदेव शेलार यांनी शासनाकडे केली आहे.


Post a Comment

 
Top