0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
'लॉकडाऊनमुळे रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्वाच्या प्रकल्पांची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी', असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांतील सुमारे १ लाख २१ हजार श्रमिकांनी मूळ गावी जाण्याची परवानगी मागितली असून, त्यांची पाठवणी करण्यासाठी दोन्ही राज्यांकडे प्रस्ताव पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये परत जाण्यासाठी सुमारे १ लाख २१ हजार श्रमिकांनी परवानगी मागितली आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या श्रमिकांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी श्रमिकांसाठी पासेस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने बसेस उपलब्ध करुन द्याव्या’ अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. परराज्यांतून आणि अन्य जिल्ह्यांतून जिल्हयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत ठेवावी. त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी', अशी सूचनाही त्यांनी दिली.

Post a comment

 
Top