0

BY - ( नामदेव शेलार ),युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रानमेवा वाट पाहतो आपल्या दुगळया विचाराची गाठ बांधून मी कामविन,रानमेव्यात माझे शाळेचे कपडे पुस्तके होतील,माझ्या कुटूंबाचा पावसाळा जार्इल असा अपेक्षाने वाट पाहत असलेला माझा रस्त्यावरचा टोपली घेऊन बसलेला रानमेवा बांधव सुनासुना आहे.कधी याल तुम्ही याची वाट पाहतोय आतुरतेने अशा मुकबघ्या आवाजाने पर्यटकांची वाट पाहत आहे रानमेवा…
          रानवनातील पशु,पक्षी,प्राणी सुध्दा रस्त्यावरून कोणच का जात नाही,गाडयाचा आवाज येत नाही,त्यांच्या आवाजातला उत्साही आनंद गडद झाला आहे.कोकीळ गावू लागली मात्र,झाडाची पानं हलताना माणसातील कमीपणा वाटू लागली आहे.ज्यांचा रानमेवा संसार त्याचप्रमाणे ज्यांना रानमेवा खाण्याचा आनंद कोरोनानी हिरावून घेतला आहे.मोहराचं भर आला,गावाकडची काळी मैना कशी कुलून राहिली आहे.मामाच्या गावांची मज्जा लुटण्याचा आनंद मुलाचा अपुरा राहिला आहे.
          येऊद्दयांना आमचे दिवस असेच प्रत्येकाला वाटत आहे.निसर्गाचा मानवी नातं तुटलं नाही मात्र,काहीसं अंतर पडलं आहे.पर्यटकाचा आनंद ज्यांच्या वाट सरोवर होता तोच  रानमेवा बंधिस्त दरवाजा केव्हा खुलणार याची वाट पाहतोय.दोन वर्षाच्या इतिहासाची साक्ष झाली ज्यांनी सन उन्नीस पाहिला नाही त्यांच्या सानिध्यामधील शाळा आठवणीची राहिली,नेहमीच निसर्ग घात करतो म्हणून ओरडणारे आज गप्प आहेत परंतू खरं नातं निसर्ग आणि माणसाचच आहे याची सदैव आठवण राहिल
          उद्दयाची सकाळ निसर्गात घालवणारा आज कोरोनानी घरात बंधिस्त ठेवला,ऊन,वारा,पाऊस खरचं माणसाचे मित्र आहेत आता माणसाला दिसू लागले.पडेल पाऊस भरतील शेतं,शेतकरी दादाचं रिकामं पोतंखरचं यावर्षी अनेकांनी पोतं रिकामं राहणार आहे.किती काळ मागे गेलो तरी दोष देण्यासारखी व्यक्ती समोर नाही,नेहमी पाऊस वारा,विजेला दोष देऊन आपत्कालीन वावरणारे आम्ही सारेच आपत्कालीन होऊन घरात बसलो.एकमेकांसोबत असणारे एकमेकांशी विभक्त झालो तसाच रानमेवा सुध्दा वाट पाहतोय.
          आता पाऊस पडेल,माझी शाळा सुरू होर्इल,धबधबे निर्माण होतील पण आम्हाला येथेही जाता येणार नाही कारण त्यांची उन्हाळयात करण्यात येणारी तयारी झालीच नाही.कधी कोसळलं तर तिचा भरवसा नाही.माळशेजघाटात येणार्‍या परदेशी पाहूण्यांचा आगमन होर्इल आता पण माझ्या सारख्या पर्यटकाला जाता येर्इल का ? याच गुलदस्त्यात माझी अपेक्षा झुरत अपेक्षा झुरत आहे,माझा रानमेवा माझी वाट पाहत आहे.

          आज मंदीरे बंद झाली आहेत.खरंतर मंदिरात सामान्य गोर गरिबांचा एक रूपया पासून दहा दिले जातात.संकटसमयी हेच पैसे गरीबांना थेट नाहीत तर सरकारला जातात असुद्दया मात्र,आता मंदिरे उघडुच नका ना ? एक वर्षे जाऊ द्दया ना ?
          कोरोनाने मला मरण आलं तरी चालेल परंतू माझ्या डोळयासमोर  माजी मुले भुकेली राहिली नाही पाहिजेत असं प्रत्येक मौल मजुराला वाटत आहे.एरवी हमाली करून मुलबाळाची पोट भरणारा आज कोणत्याही मदतीविना कुटूंबासह उपाशी आहे.उद्दया पुन्हा माझा संसार घर कसं सावरणार जगन्याच्या भिती तुटलेल्या आहेत.प्रत्येक गरीबीनी पिचलेला माणुस कोरोनाच्या लढार्इत हारला आहे असे प्रत्येकाचं मत व्यक्त होत आहे.
          देश वाचवताना गरीबी जास्त  वाचली आहे.गरीबाचं स्वप्न  उडाण  मातीमोल झालं आहे.शिक्षण,नोकरी,अधिकारावर आज कोणीही बोलू शकणार नाही.कारण त्यांच कुटूंब जगवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक रमला आहे.देशाचा लॉकडाऊन राज्याचा लॉकडाऊन कधी उठणार म्हणून प्रत्येक जण तारीख पे तारीख वाट पाहत आहे.कोरोनानी ज्यांना दिलं.दान त्यांना भरपूर दिलं मात्र,काहींना लाल कार्डवरचा 2 किलो तांदूळ 12 रूपयात विकला जातो.तो सुध्दा विकत  मिळाला नाही.गरीबी हटाओ योजनेत भ्रष्टाचार होत होता.मात्र,लोकांना काम मिळायाचा येथे कोरोनाच्या नावाखाली एवढा भ्रष्टाचार  सुरू आहे की धन पण नाही आणि काम सुध्दा हिशोब पण नाही आणि कारवार्इ  सुध्दा नाही फक्त बंधिस्त जगा तुम्ही तुमच्या भरवशावर अशातच गरीबीनी डोकं टेकलं आणि जगण्याचा विश्‍वास संपला विश्‍वास हरला.


Post a Comment

 
Top